भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखानंदाची राणीव । भागा आली फावली सर्व

sukhanandachi raniv | bhaga ali phavali sarva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुखानंदाची राणीव । भागा आली फावली सर्व ॥१॥ घ्याल ते घ्या रे धणीवरी । असाल जे जे या अधिकारी ॥२॥ फुकासाठीं वोळोनी आलें । घरासी दैव हें चांगलें ॥३॥ निळा म्हणे उबग नका । मानूं अवघेहि ऐका ॥४॥