भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचिया लागीं करितों । तो अवघेंचि वाव येतें

sukhachiya lagin kariton | to avaghenchi vav yeten

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
सुखाचिया लागीं करितों । तो अवघेंचि वाव येतें ॥१॥ करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥ अवघेचि सांकडें दिसोनियां आलें । न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥ चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥