भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचा सागर चोखा हा निर्धार

sukhacha sagar chokha ha nirdhar

रचनाकार: संत बंका · अभंग
सुखाचा सागर चोखा हा निर्धार । काय मी पामर गुण वानूं ॥१॥ धन्य प्रेमपान्हा पाजुनियां मातें । केलें असे सरतें आपणामाजी ॥२॥ आनंदी आनंद दाविलासे डोळा । दिली जीवनकळा माझी मज ॥३॥ वंका म्हणे माझी प्रेमाची माउली । कृपेची साउली केली मज ॥४॥