भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधींच निर्मळ वदन सोज्वळ

adhinch nirmal vadan sojval

रचनाकार: संत बंका · अभंग
आधींच निर्मळ वदन सोज्वळ । विठोबा दयाळ पंढरीये ॥१॥ समचरण गोड गोजिरी पाउलें । कर मिरवले कटवरी ॥२॥ ध्यान दिगंबर तुळशीमाळा गळा । पांघुरला पिंवळा पीतांबर ॥३॥ वंका म्हणे सर्व सुखाचे आगर । तो हा विटेवर विठ्ठल देवो ॥४॥