भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुक्यामाजी चोखा घरासी तो आला

itukyamaji chokha gharasi to ala

रचनाकार: संत बंका · अभंग
इतुक्यामाजी चोखा घरासी तो आला । वृत्त्तांत निवेदिला सोयराई ॥१॥ येरु म्हणे हें काय अनुचित केलें । बोल ते लाविले आपणासी ॥२॥ जातिचे तो महार जग जाणताती । आपुली फजिती आपुल्या हातें ॥३॥ कासयाचा पुत्र कोणाचा तो कोण । आपुले कारण साधीं आधीं ॥४॥ वंका म्हणे ऐसे बोल ते ऐकोनी । सोयर चरणीं घाली मिठी ॥५॥