भजनी मालिका

भजने

सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामें । दहन होती सकळ कर्में । आणिक वर्म दुजें नाहीं ॥१॥ वाचे म्हणे कृष्णहरी । तेणें पापा होय बोहरी । संसारासी नुरे उरी । हा महिमा सत्संगाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुख तें आपुलें चोरांशी वांटिलें । पालटें घेतलें दुःख त्यांचें ॥१॥ नित्य नवी त्याची सोसितां सोसिणा । नयेचि तुज अझोनी वीट मना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे ॥१॥ धरूनि पीतांबर नेईन एकांतीं । सांगेन जिवींची खंती तया पुढां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुख दुःख दोन्ही आम्हासीं सारिखीं । प्रतीति पारखी मना आली ॥१॥ अंतर्बाह्म एक ब्रह्मचि कोंदलें । दुजेपण नेलें निपटोनि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥ दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुख पंढरिये आलें । पुंडलिकें सांटविलें ॥१॥ घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे हिडणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम