भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख अपार संतसंगीं । दुजें अंगीं न दिसे कोठे

sukh apar santasangin | dujen angin na dise kothe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुख अपार संतसंगीं । दुजें अंगीं न दिसे कोठे ॥१॥ बहु सुख बहुता परी । येथेंची सई नसेची ॥२॥ स्त्रिया पुत्र धन सुख । नाशिवंत देख शेवटीं ॥३॥ एका जनार्दनीं संतसुखा । नोहे लेखा ब्रह्मांडी ॥४॥