भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामें । दहन होती सकळ कर्में । आणिक वर्म दुजें नाहीं

sukh anupamya santasamagamen | akhand dunavaten namen | dahan hoti sakal karmen | anik varma dujen nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामें । दहन होती सकळ कर्में । आणिक वर्म दुजें नाहीं ॥१॥ वाचे म्हणे कृष्णहरी । तेणें पापा होय बोहरी । संसारासी नुरे उरी । हा महिमा सत्संगाचा ॥२॥ काशी प्रयागादि तीर्थे बरी । बहुत असती महीवरी । परी संतसमागमाची थोरी । तीर्थे न पावती सर्वदा ॥३॥ असती दैवतें अनंत कोटी । परी संतसमागमक भेटी । दैवती सामर्थ्य हिंपुटी । हा महिमा संतांचा ॥४॥ एका जनार्दनीं मन । संतचरणीं दृढ ध्यान । तेणें प्राप्त सच्चिदानंदघन । विठ्ठल देव विसंबे ॥५॥