भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख एक आहे हरि आठवितां । इतर जपतां दुःख बहु

sukh ek ahe hari athavitan | itar japatan duhkh bahu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुख एक आहे हरि आठवितां । इतर जपतां दुःख बहु ॥१॥ ऐशी आठवण धरूनि मानसीं । हरि गावा मुखासी दिननिशीं ॥२॥ सारे दिन करा संसाराचा हेत । परी भजनीं प्रीत असों द्यावी ॥३॥ एका जनार्दनी धरूनि विश्वास । होई कां रे दास संतचरणीं ॥४॥