भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकृताचा होता सांठा । भूवैकुंठा ते आले

sukrutacha hota santha | bhuvaikuntha te ale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुकृताचा होता सांठा । भूवैकुंठा ते आले ॥१॥ सन्मुख देव भेटे तया । लागती पायां भाग्याचे ॥२॥ न्याहाळिती दृष्टि मुख । कैवल्यसुख तुच्छ पुढें ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हानंदा । झाले तत्पदा अधिकारी ॥४॥