भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख रामनामें अपार । शंकर जाणें तो विचार

sukh ramanamen apar | shankar janen to vichar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुख रामनामें अपार । शंकर जाणें तो विचार ॥१॥ गणिका जाणें रामनाम । गजेंद्र उद्धरिला राम ॥२॥ शिळा मुक्त केली । रामनामें पदा गेली ॥३॥ तारिले वानर । रामनामें ते साचार ॥४॥ रामनामें ऐसी ख्याती । एका जनार्दनीं प्रीती ॥५॥