भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख पंढरिये आलें । पुंडलिकें सांटविलें

sukh pandhariye alen | pundaliken santavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुख पंढरिये आलें । पुंडलिकें सांटविलें ॥१॥ घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे हिडणें ॥ध्रु.॥ विषय गुंडोनी ठेवीं पसारा । धांव घाला पंढरपुरा ॥२॥ आयुष्य वेंचे जंव आहे । तोंची धांवोनिया जाये ॥३॥ आळस न करीं या लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥