भजनी मालिका

भजने

सभें कंस सिंहासनीं । बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं । गेले चकपक अंगीचे निघोनी । संचारला मनीं श्रीकृष्णा ॥१॥ राव भयाचिये भक्ती । कृष्णाचि देखे सकळां भूतीं । आपआपणसीही अंतीं । कृष्णरुपेंचि देखतु ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥ वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सम सपाट वेसनकाट निःसंग झालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥ गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग ॥१॥ भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाची विधान पाडुंरग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें । हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥ कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।

रचनाकार: संत सावता

समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥ मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समर्थपणें रंका का गांजितसां स्वामी । हें काये स्वधर्मीं मिळतसे ॥१॥ आपुली करणी न विचारा मनीं । दुसरियास झणीं बोल ठेवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥१॥ दुसऱ्याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥ फावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं जाऊं॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम