भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी

samarthacha thav sanchalachi ase | durbalachi as pudhen kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥ फावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं जाऊं॥ध्रु.॥ न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥ तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥