भजनी मालिका
← भजनांकडे परत

सम सपाट वेसनकाट निःसंग झालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी

sam sapat vesanakat nihsang jhalen sauri | kudapiyela desh atan yeun nedin dusari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सम सपाट वेसनकाट निःसंग झालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥ गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥ ठाव झाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥ सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न झालें सुख भाव पालटला रंग ॥३॥ लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥ तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रतित सवें असों एकपणें ॥५॥