भजनी मालिका

भजने

सत्य आणि मिथ्या जाणा अंतरींचे । तुम्ही सकळांचे सर्वजाणा ॥१॥ म्हणऊनियां करा अनाथचा धांवा । उठाउठीं देवा पाचारितां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सत्य करी आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन । आमुचें विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥ इंद्रबारी चंद्र कर्‍हेरी । यम पाणी वाहे घरोघरीं । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथें करी दळाकांडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सत्य गुरूरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण । नाहीं रूप गुण गुणातीत ॥१॥ नाद ना भेद ना छंदे निरंतर । दोहींच्या विचारें ब्रह्म नांदे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सत्य ज्योतिलिंग बारा । प्रातःकाळीं स्मरण करा । कोटि कुळें उद्धारा । भव तरा बापहो ॥ १ ॥ वाराणसी विश्वनाथ । मोक्षदाता तो समर्थ । पुरवील अंतरीचें आर्त सोमनाथ । सोरटी ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

सत्य भोळा देव कृपेचा सागर । न मोडी उत्तर संतआज्ञा ॥१॥ भाविकाची सेवा न म्हणे फार थोडी । स्वीकारी आवडी आपुलिये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सत्यकर्म आचरें रे । बापा सत्यकर्म आचरें रे ॥१॥ सत्यकर्म आचरें होईल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥ मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्यपुरीं ऐसें म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥ नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सत्यसंकल्पाचा कर्ता जो विश्वाचा । अनाथ जीवांचा मायबाप ॥१॥ पुंडलिकें तया आणिलें रंगणीं । कटावरी पाणि ठेवूनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम