भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्यभामा माये अन्नपूर्णा होये

satyabhama maye annapurna hoye

सत्यभामा माये अन्नपूर्णा होये । वेळोवेळां सूये कवळू मुखीं ॥ १ ॥ राहीरखुमाई आदिमाता मोहे । नामा तो उपायें बुझाविती ॥ २ ॥ घेरे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाला । आवडसि गोपाळां प्रीतीहूनी ॥ ३ ॥ कुर्वाळितो हरि नुघडी तो दृष्टी । सप्रेमाच्यां पोटी अधिक होसी ॥ ४ ॥ धरूनि हनुवटी पाहे कृपादृष्टी । आनंदाचे सृष्टि माजि नामा ॥ ५ ॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगा हरि । यांसी परोपरी कवळू देतु ॥ ६ ॥