भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य आणि मिथ्या जाणा अंतरींचे । तुम्ही सकळांचे सर्वजाणा

satya ani mithya jana antarinche | tumhi sakalanche sarvajana

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सत्य आणि मिथ्या जाणा अंतरींचे । तुम्ही सकळांचे सर्वजाणा ॥१॥ म्हणऊनियां करा अनाथचा धांवा । उठाउठीं देवा पाचारितां ॥२॥ न चले झांकिलें तुम्हांपुढे कांहीं । असा अंतर्बाहीं व्यापूनियां ॥३॥ जिवीं एक दावी बोलोनि आणीक । तरि मज सकळिक दुषिति संत ॥४॥ निळा म्हणे माझें सबाह्य अंतर । तुम्ही निरंतर जाणतसां ॥५॥