भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्यज्ञान (अनंत) तेंचि गगनाचे प्रावर्ण

satyadnyan (anant) tenchi gaganache pravarna

सत्यज्ञान (अनंत) तेंचि गगनाचे प्रावर्ण । नाहीं रूप गुण वर्ण जेथे ॥१॥ तो हा श्रीहारी पाहिला डोळेभरी । पाहतां पाहणें दुरी सांडोनिया ॥२॥ वाचेचा उच्चार नवल हे साचार । स्वरूप निर्विकार कोंदाटलें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती । ती ही उभी मूर्ती विटेवरी ॥४॥