भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण । नाहीं रूप गुण गुणातीत

satya dnyananand gaganachen pravarna | nahin rup gun gunatit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण । नाहीं रूप गुण गुणातीत ॥१॥ नाद ना भेद ना छंदे निरंतर । दोहींच्या विचारें ब्रह्म नांदे ॥२॥ येकवटी ब्रह्म आत्माराम रूप । तें पाहा स्वरूप लावण्याचें ॥३॥ नामा म्हणे केलें चैतन्य जवल । मांडियेला खेळ संतीं तेथें ॥४॥