भजनी मालिका

भजने

योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या ॥१॥ तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगी हे शिणती तुझिये प्राप्तिलागीं । नातुडसी जगीं कवणासी ॥१॥ एक जटा नखेम स्वयें वाढविती । दिगंबर होती एक देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें ॥१॥ तो भाविकांचे कीर्तनीं आपुलें । सुख अनुभवी वहिलें । प्रेमें ब्रह्मानंदी डोले । वैष्णावांचें सदनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ती सोहळा मान ॥१॥ येरयेरांवरी जायांचें उसणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी ॥१॥ विठ्ठल सांवळा पाहुं चला डोळां । धरुनी बाळलीला कटीं कर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रकार मकार बांधी कां रे तुळीं । तापत्रय होळी होऊनि जाय ॥१॥ गोविंद मुकुंद हरि परमानंद । कृष्ण केशव छंद नित्य वाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जनां ॥१॥ नारी अथवा नर हो कां दुराचारी । वाचे म्हणतीं हरी सर्व मुक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रखितो गोध्नेआं मनाचेनी मनें । न पुरे अवसरु धावण्यां धावणें । कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

रखुमाई माता राही ओंवाळिती । नित्य पंचारती हरिच्या दासां ॥१॥ नित्य भक्तां हरि यालागीं विनट । पंढरीची पेठ वसविली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रखुमाई म्हणे ऐकतां जी ताता । संन्यास घ्यावा आतां म्हणताती ॥१॥ संतती वांचूनि न घ्यावा संन्यास । ऐसें सांगावें त्यांस म्हणितलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रंगलिया या रंगें पालट न घरी । सेवलें अंतरीं पालटेना॥१॥ सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम