भजनी मालिका
← भजनांकडे परत

रंगले ते संतसंगें । झाले अंगे शुध्द बुध्द

rangale te santasangen | jhale ange shudhda budhda

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रंगले ते संतसंगें । झाले अंगे शुध्द बुध्द ॥१॥ देवचि संत देवचि संत । आणिकांही करीत देवचि ते ॥२॥ कैंचें तेथें व्यवधान । ब्रम्ह सनातन पाववितां ॥३॥ निळा म्हणे न लभे देवा । आणिती भावा त्या संत ॥४॥