भजनी मालिका
← भजनांकडे परत

रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जनां

rakarasi kanha makarapudhati | smaratan hoy mukti sarva janan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जनां ॥१॥ नारी अथवा नर हो कां दुराचारी । वाचे म्हणतीं हरी सर्व मुक्त ॥२॥ सायास तो नाहीं अनायासें काम । वाचे रामनाम सदां गावें ॥३॥ एका जनार्दनीं धरा हेतू मनीं । श्रीराम वदनीं उच्चारावा ॥४॥