भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगी शिणती साधनीं । पावन होती ते कीर्तनीं

yogi shinati sadhanin | pavan hoti te kirtanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगी शिणती साधनीं । पावन होती ते कीर्तनीं ॥१॥ अष्टांग धूम्रपान । तया श्रेष्ठ हें साधन ॥२॥ समाधी उन्मनी । कीर्तनीं पावन हे दोनी ॥३॥ चौदेहांसी अतीत । कीर्तनीं होतीं तें मुक्त ॥४॥ कर्म धर्म न लगे श्रम । व्यर्थ वाउगा विश्रांम ॥५॥ कीर्तन छंद निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥६॥