भजनी मालिका
← भजनांकडे परत

रखुमाई म्हणे ऐकतां जी ताता । संन्यास घ्यावा आतां म्हणताती

rakhumai mhane aikatan ji tata | sannyas ghyava atan mhanatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रखुमाई म्हणे ऐकतां जी ताता । संन्यास घ्यावा आतां म्हणताती ॥१॥ संतती वांचूनि न घ्यावा संन्यास । ऐसें सांगावें त्यांस म्हणितलें ॥२॥ निरोपाची वाट पाहे भलत्या मिसें । रखुमाई असे सावधान ॥३॥ असताम दुश्चितपणें निरोप पुसिला । जा जा म्हणे दिधला अवसरु ॥४॥ जाऊनि विठठलें घेतला संन्यास । चिंता रखुमाईस पडली भारी ॥५॥