भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें

yogiyanche chintani na baise | yadnya yagadikansin jo na givase | to bhavikanchen kirtanasarisen | nachatasen ananden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें ॥१॥ तो भाविकांचे कीर्तनीं आपुलें । सुख अनुभवी वहिलें । प्रेमें ब्रह्मानंदी डोले । वैष्णावांचें सदनीं ॥२॥ यज्ञांचें अवदानीं न धाये । तो क्षीरापतीलागीं मुख पसरुनि धांवें । केवढें नवले सांगावें । या वैष्णवसुखाचें ॥३॥ सुख येतें समाधानीं । म्हणोनि सुख जनार्दनीं । एका जनार्दनाचे चरणीं । सप्रेमें विनटला ॥४॥