भजनी मालिका

भजने

येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊं द्या ॥१॥ मग मी तुमच्या न सोडीं पायां । कारीन काया कुर्वंडीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासीं । कां रें प्रपंचासी गुंतुनीं पडसी ॥१॥ वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरींचे बोल सर्व वायां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥१॥ धन्य बळीया आम्हीं की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती अवनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येवोनिया काळ बैसलासे उसां । झाकितोसी कैसा डोळे आतां ॥१॥ वाचे नारायण वदे तूं सादर । काळपाश साचार चुके जेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली ॥१॥ ठेवूनियां बाळ जीवनालागीं गेलें । तुम्हीं काय केलें बाळ माझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥ चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आतां आम्हांकारण काय कमी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिले स्फ़ुंदन सदगदित ॥१॥ सांवता म्हणे नाम्या कां रे रडतोसी । काय जाहले तुजसी सांग मज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येव्हढें जया कृपेचें करणें । रंक राज्यपदें मिरवती ॥१॥ तो हा कल्पतरु गुरुजनार्दनु । छेदी देहाभिमानु भवकंदु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥ नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

योग याग तप व्रत आणि दान । करितां साधन नाना कष्‍ट ॥१॥ सुलभ सोपेरें नाम विठोबाचें । सकळ साधनांचें मूळ बीज ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

योग याग यज्ञ इच्छिसी कामना । परि केशव निधाना विसरसी ॥१॥ नेणेचि हें मन भुललें अज्ञानें । यातायाति पतनें भोगूं पाहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योग साधोनी पंचाग्नी साधिती । न कळे योगाची गती फजीतखोरा ॥१॥ वाउगें साधन वाउगें साधन । तेणें विटंबन होत असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ