भजनी मालिका
← भजनांकडे परत

येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली

yevoniyan javalin bobhat to kela | dharuni hatala pusati jahali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली ॥१॥ ठेवूनियां बाळ जीवनालागीं गेलें । तुम्हीं काय केलें बाळ माझें ॥२॥ परि तो समाधिस्थ नायकेचि बोल । वाचे गाय विठ्ठल प्रेमभरित ॥३॥ नाचे आनंदानें गाय नामावळी । एका जनार्दनीं बोली कोण मानी ॥४॥