भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला

yog shin jhala | tujavanchuni viththala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
योग शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला ॥१॥ योग करितां अष्टांग । तुजविण शुका रोग॥२॥ बैसला कपार्टी। रंभा लागे त्याच्यापाठीं ॥३॥ तई त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला॥४॥ सांगोनी पुत्रार्ते। त्यांचि छळिलें कश्यपाते ॥५॥ अमराच्या राया। म्हणे जनी सुखालया ॥६॥