भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग याग विधी येणें नव्हे सिध्दि

yog yag vidhi yenen navhe sidhdi

योग याग विधी येणें नव्हे सिध्दि । वायाचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंवीण देव नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेविण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हीत कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधुंचे संगती तरुणोपाय ॥४॥