भजनी मालिका
← भजनांकडे परत

येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊं द्या

yevadha purava manincha chhand | vache govind athaun dya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊं द्या ॥१॥ मग मी तुमच्या न सोडीं पायां । कारीन काया कुर्वंडीं ॥२॥ वारंवार क्षणक्षणा । संत चरणीं वंदीन ॥३॥ दुजा नका काहीं हेत । एका जनार्दनीं मागत ॥४॥