भजनी मालिका
← भजनांकडे परत

येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला

yevoniyan ragen namyasi bolat | vyapar bahut nika kela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥ चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आतां आम्हांकारण काय कमी ॥२॥ तुझिये व्यापारें भोपळा हा घ्यावा । भिकेसी बरवा उपाय असे ॥३॥ एका जनार्दनीं दामा बोले क्रोधें । नामा तो सद्वदे उत्तर देत ॥४॥