भजनी मालिका

भजने

मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥ वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें । अवघेंचि येणें मनें काळापिवन केलें ॥१॥ लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे । सूक्ष्म ह्मणो तरि अगाधही नव्हे ॥

मनाचिये साक्षी झाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥ तुम्हां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मनाची नखी न लगे जयां ठाया । तेणें उणी पायां भेटवी संत ॥१॥ संत उदार उदार । नामामृतें भरलें सागर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनाचें तें मन ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥१॥ ध्यानाचें तें ध्यान ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनाचें मनपण सांडितां रोकडें । अंतरींचें जोडे परब्रह्म ॥१॥ नाथिला प्रपंच धरोनियां जीवीं । सत्य तें नाठवीं कदाकाळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मनाचे माथां घातिला धोंडा । वासना कापुनी केला लांडा ॥१॥ जनीं लांडा वनीं लांडा । वासना रांडा सांडियलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनाचेनि मनें जहालों शरणागत । कृपावंत संत मायबाप ॥१॥ धरुनियां आस घातली लोळणीं । मस्तक चरणीं माझा तुमच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनामधीं तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥ म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ