भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचे माथां घातिला धोंडा । वासना कापुनी केला लांडा

manache mathan ghatila dhonda | vasana kapuni kela landa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनाचे माथां घातिला धोंडा । वासना कापुनी केला लांडा ॥१॥ जनीं लांडा वनीं लांडा । वासना रांडा सांडियलें ॥२॥ वासना सांडोनी जालों सांड्या । कामना कामिक म्हणती गांड्या ॥३॥ कामना सांडे विषयीं लाताडे । एका जनार्दनीं तयाची चाड ॥४॥