भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचे मवाळ हरिरुप चितिती

manache maval harirup chititi

रचनाकार: संत सोपान · अभंग
मनाचे मवाळ हरिरुप चितिती । रामकृष्ण मूर्ति नित्य कथा ।।१।। रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वधा । न पवेल आपदा नाना योनी ॥२॥ हरि ध्यान जप मुक्त पै अनंत । जीव शिवी रत सर्वकाळ ॥३॥ सोपान प्रेमा आनंद हरीचा । तुटला मोहाचा मोहपाश ॥४॥