भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचा सविस्तार । ऐका तुम्हीं वो निर्धार

manacha savistar | aika tumhin vo nirdhar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनाचा सविस्तार । ऐका तुम्हीं वो निर्धार ॥१॥ मनें केलें सगुण निर्गुण । मनें दाखविलें चैतन्य ॥२॥ मनें नागविलें देवा । मनें लोळविलें जीवां ॥३॥ मन अज्ञानाची राशी । मन धांवें ते सायासी ॥४॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधोन ॥५॥