भजनी मालिका

भजने

भक्ता पुंडलिका देखोनि निकटा । आलासी वैकुंठा-हूनि आजी ॥१॥ नारद वचन ऐकोनियां मनीं । सुखें चक्रपाणी सुखावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्ताघरींचें करीन काम । त्यांचेंच नाम वागवीन ॥१॥ भक्तरुपें विराजलों । स्थिरावलों ह्रदयीं त्यां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्तांचा महिमा भक्त चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥ जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्ताचांचि वोरस देवा धांवे सेवा करुं त्यांची ॥१॥ जें जें गोड वाटें मनीं । तें तें वदनीं भरीं तयां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्तांचिया गांवा येशी पै धांवत । न बोलतां तिष्ठत उभा पुढें ॥१॥ न बैससी खालीं न पाहे माघारें । मौन पं निर्धारें धरुनि उभा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्ताचिया भावा होऊनि ऋणायितु । उभा असे तिष्ठतु पंढरिये ॥१॥ महाद्वारींची हे तळींची पायरी । तो वैकुठावरी कळस केला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥ कनवाळु उदार तो हा श्रीहरी । जडजीवा उद्धरी नामें एका ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा