भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताचिया घरीं । नीच काम देव करी

bhaktachiya gharin | nich kam dev kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ताचिया घरीं । नीच काम देव करी ॥१॥ धर्माघरीं उच्छिष्ट काढी । अर्जुनाची धुतो घोडीं ॥२॥ विदुराच्या भक्षी कण्या । द्रौपदीधांवण्या धांवतु ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥