भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये

bhaktanchiya lobha vaikunth sandilen | ubhenchi rahile pandhariye

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥ कनवाळु उदार तो हा श्रीहरी । जडजीवा उद्धरी नामें एका ॥२॥ बांधियेलें ब्रीद तोडर चरणीं । त्रैलोक्याचा धनी पंढरीये ॥३॥ चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल । नलगे काळ वेळ नाम घेतां ॥४॥