भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुरुराव

bhakta jaisa manorath | puravi samartha gururav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुरुराव ॥१॥ नित्य ध्यातां तयाचे चरण । करी संसारा खंडन ॥२॥ वानूं चरणांची पवित्रता । उद्धार जडजीवां तत्वतां ॥३॥ अवचट लागतांचि कर । एका जनार्दनीं उद्धार ॥४॥