भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांचिया गांवा आला । देव परमानंदे धाला

bhaktanchiya ganva ala | dev paramanande dhala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तांचिया गांवा आला । देव परमानंदे धाला ॥१॥ म्हणे नवजायें येथुनी । आतां भक्तांसी टाकुनी ॥२॥ शीण माझा हरला भाग । गोड वाटे याचा संग ॥३॥ निळा म्हणे विजयी झालें । देवा भक्त घेउनी आले ॥४॥