भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तसेवेच्या उपकारें । बहुत आभारें दाटलों

bhaktasevechya upakaren | bahut abharen datalon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तसेवेच्या उपकारें । बहुत आभारें दाटलों ॥१॥ काय उत्तीर्ण व्हावें यासी । रुकमाईसी विचारी ॥२॥ देतां कांहीच न घेती । उदासवृत्ती सर्वदा ॥३॥ निळा म्हणे जिवींचि जडले । तिहीं मज केलें अंकित ॥४॥