भजनी मालिका

भजने

बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारें नावडती ॥१॥ अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागीं तयासी न विसंबो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । ठाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥ आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुडविलें जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥ पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥ माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥ जात वित गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा