भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा

bahu bhiton janapana | ad na yo narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा । घेइन प्रेमपान्हा । भक्तीसुख निवाडें ॥१॥ यासी तुळे ऐसे कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं । काला भात दहीं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ निमिशा अर्ध संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं । मोक्षपदें येती । ते विश्रांति बापुडी ॥२॥ तुका म्हणे हें चि देई । मीतूंपणा खंड नाहीं । बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥३॥