भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु वाटे भये । माझे उडी घाला दये

bahu vate bhaye | majhe udi ghala daye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥ फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥ कुंटित चि युक्ती । माझ्या जाल्या सर्व शक्ती ॥२॥ तुका म्हणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥