भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । ठाकोनियां मनीं ठेविला सीण

bahu ya prapanchen bhogavilya khani | thakoniyan manin thevila sin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । ठाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥ आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥ बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥२॥ तुका म्हणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप झाला तुझा ॥३॥