भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं

bahut asati magen sukhi kelin | anatha mauli jivanchi tun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥ माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥ कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।२॥ विचारितां नाहीं दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्याप्य कोणी ॥३॥ म्हणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥ तुका म्हणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥