भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा

bahu baren ekaekin | sang chuki karava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥१॥ ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥ सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥ तुका म्हणे निघे आगी । दुजे संगीं आतळतां ॥३॥