भजनी मालिका

भजने

आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूं चि ॥१॥ आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचलें कल्पांती विमान तें ॥१॥ आतां यासी काय करावा उपाय । येरु म्हणती पाहे ग्रामामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हां रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥ वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिक तें आम्हां न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून आनु नेणों ॥१॥ राम कृष्ण हरि विठ्ठल उच्चार । करुं हा गजर वाहुं टाळी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिक तों युक्ति नाहीं माझया हातीं । आहें मूढमति म्हणूनियां ॥१॥ वारंवार तुम्हां करितों सूचना । नामें दयाघना उच्चारुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥ तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥ मुखा तें चि गोड श्रवणी आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणिक वाद्यें तेथें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ चिद्रत्नमंडप दिसला कल्लोळ । जैसे दीपमाळ दीप ठेले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव