भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा

anik mat majhya navade jivasi | kay karun yasi panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥ मुखा तें चि गोड श्रवणी आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥ जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥२॥ आणिकाचें मज म्हणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥३॥ तुका म्हणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥४॥